निबुंत—काशी-अयोध्या संकल्प यात्रेची सांगता गंगापूजनाने उत्साहात.

               पुरंदर रिपोर्टर लाईव्ह  

निंबूत. प्रतिनिधी

         सतीशभैय्या कल्याणकारी संघ व  सतीशराव  काकडे  यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या व तीन टप्प्यात पार पडलेल्या काशी-अयोध्या संकल्प यात्रेची सांगता गंगापूजनाने झाली. हा पूजन सोहळा श्री. बाबालाल साहेबराव काकडे देशमुख विद्यालयाच्या प्रांगणात संपन्न झाला.


या यात्रेत निंबूत व परिसरातील ५०६ महिलांनी सहभाग घेतला. गंगापूजन कार्यक्रमास शेतकरी कृती समितीचे नेते सतीश काकडे , जिल्हा परिषद माजी सदस्य सविता काकडे, सोमेश्वर चे संचालक अभिजीत काकडे, नींबूत ग्रामविकास प्रतिष्ठान संचालिका तेजस्विनी काकडे आणि मानद सचिव मदन काकडे उपस्थित होते.


कार्यक्रमाचे धार्मिक मार्गदर्शन चंद्रकांत केंजळे व नारायण मिश्रा यांनी केले. यात्रेतील दिपाली ननावरे, शुभांगी काकडे, शितल लकडे, राणी शिंदे, उषा पवार, दीप्ती काकडे, मंगल आगवणे,ज्योती नवले या महिलांनी अनुभव कथन करत सतीश काकडे यांच्या दानशूर व समाजाभिमुख कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. प्रवासात आलेले अनुभव मदन काकडे, आदिनाथ गायकवाड यांनी सांगितले.  

अभिजीत काकडे यांनी पुढील द्वारका दर्शन यात्रा आयोजित करण्याचा संकल्प व्यक्त केला, तर सतीश काकडे यांनी महिलांना विमान प्रवासाचा अनुभव देण्याचा मानस जाहीर केला. संकल्प यात्रेची सांगता गंगा पूजनाने करण्यासाठी टीम प्रमुख मदन काकडे, रुपेश काकडे, विक्रम काकडे त्याचबरोबर सर्व स्वयंसेवक यांनी नियोजनबद्ध आखणी केली होती.     कार्यक्रमानंतर सुमारे १८०० भाविकांना महाप्रसादाचे वाटप करण्यात आले.

     सूत्रसंचालन मधुकर बनसोडे यांनी, तर आभार अभिजीत काकडे यांनी मानले.

Post a Comment

0 Comments